समर्थस्थापित मारुती
श्री मारुती ही बलाची, बुद्धीची व विद्येची देवता आहे. रामभक्त व हनुमानभक्त समर्थ रामदास स्वामींना हनुमंताचाच अवतार समजले जात होते. १२ वर्षे तपश्चर्या केल्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. त्यामुळे त्याकाळच्या समाजस्थितीचे दर्शन त्यांना झाले. भारत भ्रमण करून झाल्यानंतर त्यांनी असे ठरविले की, आपल्याजवळ असणार्या ज्ञानाचा, अनुभवाचा, प्राप्त झालेल्या सिद्धींचा उपयोग जनतेची मने रामभक्तीकडे वळवण्यासाठी करावा, श्रीरामाचा दास मारुती याच्या अंगी असलेल्या बलाची उपासनादेखील लोकांना शिकवावी व यासाठी लोकजागृती करावी. संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करत कित्येक गावात त्यांनी स्वत: श्रीमारुतीची स्थापना केली. परंतु त्यांनी ११ ठिकाणी स्थापन केलेल्या मारुतींना विशेष महत्त्व आहे. हे ११ मारुती ही जागृत देवस्थाने मानली जातात. हे सर्व मारुती कृष्णानदीच्या तीरावर आहेत. लोकांना मारुतीच्या उपासनेला लावून समर्थांनी धैर्य आणि बलसंपादनाची ईर्षा लोकांमध्ये जागृत केली.
शहाजीराजे भोसले यांच्या जहागिरीच्या क्षेत्रातच हे विशेष महत्त्व असलेले अकरा मारुती आहेत, ही विचार करण्यासारखी बाब आहे. समर्थ रामदासांच्या शिष्य वेणास्वामी ह्यांच्या एका अभंगात अकरा मारुतींचा उल्लेख आहे. तो अभंग पुढीलप्रमाणे -
‘चाफळामाजीं दोन, उंब्रेजेसी येक।
परागांवी देख चौथा तो हा।।
पांचवा मसुरीं, शहापुरीं सहावा।
जाण तो सातवा शिराळ्यांत।।
सिंगणवाडीं आठवा, मनपाडळें नववा।
दहावा जाणावा माजगावीं।।
बाह्यांत अकरावा येणेरीती गावा।
सर्व मनोरथा पुरवील।।
वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास।
कीर्ती गगनांत न समावे।।’
समर्थांनी स्थापन केलेले अकरा मारुती सूची :
१. शहापूर -१ स्थापना शके १५६६ (इ. स. १६४४)
२. मसूर -१ स्थापना शके १५६७ (इ. स. १६४५)
३. चाफळ -२ स्थापना शके १५७० (इ.स. १६४८)
४. शिंगणवाडी -१ स्थापना शके १५७१ (इ. स. १६४९)
५. उंब्रज -१ स्थापना शके १५७१ (इ. स. १६४९)
६. माजगाव -१ स्थशपना शके १५७१ (इ. स. १६४९)
७. बहे बोरगाव -१ स्थापना शके १५७३ (इ. स. १६५१)
८. मनपाडळे -१ स्थापना शके १५७३ (इ. स. १६५१)
९. पारगाव -१ स्थापना शके १५७४ (इ. स. १६५२)
१०. शिराळे -१ स्थापना शके १५७६ (इ. स. १६५४)
ही सर्व मारुती मंदिरे सातारा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांच्या परिसरात आहेत.

समर्थ स्थापित अकरा मारूती
१. श्रीक्षेत्र शहापूर -
शहापूरचा चुन्याचा मारुती म्हणजे समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी पहिला मारुती आहे. अकरा मारुतींच्या स्थापनेच्या कालावधीबाबत अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत, पण ‘पहिला मारुती शहापूरचाच’ याबाबत सर्वांचे एकमत असल्याचे आढळते. मूर्तीची उंची सुमारे ६ फूट असून मूर्तीचा चेहरा उग्र वाटणारा आहे. मारुतीच्या डोक्याला गोंड्याची टोपी आहे. मंदिर व मूर्ती ही पूर्वाभिमुख आहे. देवळाला तीन चौकटी आहेत. शहापूरकर कुलकर्णी यांच्या घराण्याकडे मूर्तीची व्यवस्था आहे. याठिकाणी चैत्र शु. १५ व्या तिथीला दरवर्षी मोठ्या प्रमाणात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. मुख्य मूर्तीबरोबरच मंदिरात एक लहानशी पितळी उत्सवमूर्ती आहे. ही उत्सवमूर्ती चाफळच्या रामनवमीच्या उत्सवात, तेथील मंदिरात दरवर्षी आणलीच जाते.
शहापूरच्या मारुतीची स्थापना शके १५६६ साली केली गेली. कर्हाड - मसूर या रत्स्यावर कर्हाडपासून सुमारे १० कि. मी. अंतरावर शहापूरला जाण्यासाठी रस्ता आहे. मंदिर गावाच्या एका बाजूला असून कृष्णा नदीच्या तीरावर आहे.

२. श्रीक्षेत्र मसूर -
समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी मसूरचा ‘महारुद्र हनुमान’ हा एक महत्त्वाचा मारुती आहे. मूर्ती चुन्याची आहे. मूर्ती पूर्वाभिमुख असून मूर्तीची उंची साधारणत: ५ फूट आहे. अकरा मारुतींपैकी ही सर्वात देखणी व प्रसन्न मूर्ती आहे. डोक्यावर मुकुट, गळ्यातील माळा, हार, जानवे, लंगोटाचे काठ, हाताची बोटे इत्यादी सर्व गोष्टी अतिशय बारकाव्यांनी रंगविलेल्या आहेत. मूर्तीच्या डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज तर उजव्या बाजूला समर्थ रामदासांची चित्रे काढलेली आहेत. इथे चैत्र शु. १५ ला हनुमानजयंतीचा उत्सव अगदी मोठ्या प्रमाणात साजरा होतो.
या मारुतीच्या स्थापनेनंतर इथे दरवर्षी रामनवमीचा उत्सव साजरा केला जात होता. एका वर्षी या उत्सवातच समर्थांना कल्याण नावाचा शिष्य मिळाला. तेच समर्थांचे आवडते शिष्य ‘कल्याणस्वामी’ होत.
सुमारे १३ फूट लांबी-रुंदीचा चौरस असलेल्या सभामंडपात सहा दगडी खांब आहेत. अलीकडच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार सज्जनगडच्या श्रीरामदासस्वामी संस्थान या संस्थेने केला आहे. मंदिराजवळच श्री नारायण महाराजांचा मठ आहे.
श्रीक्षेत्र शहापूर या ठिकाणापासून मसूर फक्त ४-५ कि. मी. अंतरावर आहे. पुणे-मिरज या मार्गावर मसूर रेल्वे स्टेशन आहे.

३. चाफळचे दोन मारुती -
चाफळ आणि सज्जनगड ही समर्थांच्या जीवनातील दोन महत्त्वाची ठिकाणे. श्रीरामाने दिलेल्या दृष्टांताप्रमाणे अंगापूरच्या डोहातील श्री रामाची मूर्ती समर्थांनी बाहेर काढली व जवळच असलेल्या चाफळला आणून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली. या मंदिराचे बांधकाम शके १५६९ पूर्ण झाले. समर्थांना ज्या वेळी श्रीरामाने दृष्टांत देऊन अंगापूरच्या डोहातील मूर्तीविषयी माहिती दिली, त्याच वेळेस मारुतीनेही समर्थांना दृष्टांत दिला की, ‘माझी मूर्ती श्रीरामाच्या समोर स्थापन कर.’ त्याप्रमाणे श्रीरामाच्या मंदिरात हात जोडून उभा असलेला दासमारुती आणि मंदिराच्या मागे प्रतापमारुती अशा दोन मूर्तींची स्थापना शके १५७० मध्ये समर्थांनी केली. (चाफळ येथील श्रीराम मंदिराच्या परिसरात समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाल्याचे म्हटले जाते.)
अ. दासमारुती -
दोन्ही हात जोडून उभी असलेली नम्र मारुतीची मूर्ती म्हणजे अकरा मारुतींपैकी दासमारुती होय. ६ फूट उंच असलेल्या मारुतीच्या चेहर्यावर विनम्र असे भाव आहेत. समोरच उभ्या असलेल्या श्रीरामाच्या चरणांवर मारुतीची दृष्टी आहे. मूर्ती अत्यंत रेखीव आहे.
मंदिर अतिशय सुंदर असून आजुबाजुच्या परिसरात प्रसन्न वातावरण आहे. सुमारे ३६० वर्षांपूर्वी समर्थांनी बांधलेले दासमारुतीचे मंदिर आजतागायत चांगल्या स्थितीत आहे. मंदिर एवढे भक्कम आहे की, १९६७ साली झालेल्या भूकंपातही या मंदिरास एक तडाही गेला नाही.

ब. प्रतापमारुती -
अकरा मारुतींपैकी हा महत्त्वाचा मारुती आणि चाफळमधील हा दुसरा मारुती होय. भीममारुती, प्रतापमारुती किंवा वीर मारुती अशी तीन नावांनी हा मारुती ओळखला जातो. मूर्ती जवळजवळ आठ फूट उंच आहे. मारुती स्तोत्रात वर्णन केल्याप्रमाणे ही मूर्ती आहे. मूर्तीच्या मस्तकावर मुकुट असून कानात कुंडले आहेत. कंबरेभोवती सुवर्णाची कासोटी असून तिला छोट्या घंटा जोडलेल्या आहेत. (सुवर्ण कटि कासोटी, घंटा किणकिणी...) मूर्ती अतिशय तेजस्वी आहे. भक्तांच्या श्रद्धापूर्वक प्रार्थनेला पावणारा व दुष्टांचा संहार करणारा हा भीमरूपी मारुती एक जागृत देवस्थान आहे.
समर्थ रामदास जेव्हा या मठात राहत असत, तेव्हा या मंदिरातील मूर्तीपाशी बराच वेळ बसून राहत असे म्हटले जाते. चाफळ गावावरील कोणतेही संकट या मूर्तीच्या पूजेने दूर होते, अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे. प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात ह्या मारुतीला महारुद्राभिषेक करण्यात येतो.
चाफळमधील या दोन्हीही प्रसिद्ध मारुतींच्या दर्शनासाठी जाण्यासाठी बसेसची सोय आहे. भाविकांना मंदिराच्या परिसरात उत्तम प्रकारची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा